पोटाचे रोग व त्याचे घरेलू उपचार-घरचा वैद्य  Stomach disease and its home remedies - घरचा वैद्य-तुमचे आरोग्य,तुमच्या हातात
हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, असं म्हणतात की, जर आपलं पोट व्यवस्थित असेल तर ८०% रोग आपोआपच संपुष्टात येतात. यामुळे आपल्याला आपल्या पोटाची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण पोटाचे रोग व त्याचे घरेलू उपचार याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो बघूया पोटाचे रोग व त्याचे घरेलू उपचार.

पोटाचे रोग होऊ नये यासाठी खालील गोष्टींचे पालन करा

  • सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात एक लिंबू पिळून प्यावे. नंतर शौचास जावे.
  • झोपताना थंड पाणी किंवा दुधाबरोबर सत इसबगोल एक-दोन चमचे टाकून घ्यावे.
  • सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तिचे बारीक तुकडे तोंडात ठेवावे व तासभर चघळत राहावे. नंतर चावून गिळून टाकावे. जेव्हा शरीर अत्यंत थकलेले असेल किंवा अत्यंत भूक लागली असेल, आम्लपित्त वाढलेले असेल अशा वेळेस हरडीचे सेवन करू नये.
  • रात्री झोपताना एक कप दुधात उकळलेले एक अंजीर व बिया काढलेले दोन मुनक्का दुधात टाकून चांगले चावून चावून खावे नंतर ते दुध सुद्धा प्यावे.
मित्रांनो, पोटाच्या रोगांपासून वाचण्यासाठी वरील दिलेले सर्व प्रयोग करणे गरजेचे आहे.

अतिसार (हगवण)

  • डाळिंबाच्या पानांचा रस 2 चमचे घेऊन त्यात साखर टाकून प्यायल्याने हगवण थांबते.
  • एक पेला नारळाच्या पाण्यात एक चमचा वाटलेले जीरे टाकून प्याल्याने अतिसरात आराम येतो. 
  • पाण्यात उकडलेली कच्ची पपई दोन-तीन दिवस खावी.
  • जायफळ लिंबाच्या रसात उगाळून चाटावे याने शौचास साफ होते व पोटातले वायु नष्ट होतात.
  • एक चमचा लिंबाच्या रसात चार चमचे दुध मिसळून घेतल्यास अर्ध्या तासात आराम येतो.

मळमळणे व ओंकार येणे

  • अर्धा लिंबाच्या रसात अर्धा ग्राम जिरे व अर्धा ग्रॅम वेलची चे दाने वाटून 50 ग्रॅम पाण्यात मिश्रण करावे दोन दोन तासात प्यायला द्यावे. उलटी बंद करण्यासाठी चांगला उपाय आहे.
  • दहा ग्रॅम आल्याच्या रसात दहा ग्राम कांद्याचा रस कालवून प्यावा.

पोट दुखणे

  • वाता मुळे पोट फुगल्याने पोटावर ताण वाढतो. त्यामुळे पोट दुखते ओवा आणि काळे मीठ वाटून दोन्ही समप्रमाणात मिसळून ठेवावे. हे मिश्रण एक चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्याने अधोवायू निघून जातो व पोट दुखी थांबून जाते.
  • अमृतधारा चे तीन-चार थेंब बतासा मध्ये टाकून खाल्ल्याने पोटदुखीत आराम येतो.
  • अजीर्ण झाल्यामुळे पोट दुखत असेल तर दहा ग्रॅम मोहरी एक कप पाण्याबरोबर न चावता घेतल्याने पोट दुखी थांबते.

पोटातील कृमी

  • अर्धा चमचा मोहरीची पूड एक वाटी ताज्या दह्यात मिसळून एक आठवडा पर्यंत घेतल्याने पोटातील किडे मरून जातात.
  • दोन टोमॅटो, काळी मिरी, मिठा बरोबर निराहार खाल्ल्याने पोटातील कृमी नष्ट होतात.

पोटात आग होणे

  • सारखे चहा पिल्यामुळे, तिखट-मसालेदार जेवणामुळे जर पोटात आग होत असेल तर कच्चे सिंघाडे खावे. त्यामुळे अवश्य आराम येतो.

भूक न लागणे

  • आल्याचा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा मध दोन्ही वेळा जेवणानंतर घ्यावा.
  • एक चमचा जिरे, चिमूटभर हिंग, पाव चमचा काळे मीठ व चिमूटभर ओवा घेऊन सर्वांना अर्धा ग्लास पाण्यात मिसळून दिवसातून दोन वेळा घ्यावे.
  • मेथीची हिरवी भाजी पोटाला गारवा देणारी आणि भूक वाढवणारी असते.

भस्मक

जेवल्यानंतर थोड्याच वेळात परत भूक लागते याला भस्मक रोग म्हणतात. 
  • अशा रोग्याला केळ्याचा गर 50 ग्रॅम व एक चमचा शुद्ध तूप सकाळ-संध्याकाळ द्यावे.

आम्लपित्त (एसिडिटी)

  • आम्लपित्ता साठी हरड श्रेष्ठ औषध आहे. लहान काळी हरडीचे चुर्ण दोन ग्रॅम व दोन ग्रॅम गूळ मिसळून सायंकाळी जेवणानंतर खाऊन पाणी प्यावे. आठवडाभर सेवन केल्याने ऍसिडिटी पासून आराम येतो.
  • सकाळ-संध्याकाळ जेवणानंतर एक एक लवंग चघळल्याने एसिडिटीत आराम येतो. आम्लपित्ताच्या आरोग्यास चहा नुकसान कारक असतो. म्हणून जोपर्यंत ॲसिडिटीचा त्रास असेल तोपर्यंत चहा घेऊ नये.
  • लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून सायंकाळी प्याल्याने ऍसिडिटी कमी होते. एक कप गरम पाणी व एक चमचा लिंबाचा रस एक एक तासाने तीन वेळा घेतल्याने लवकर आराम येतो.

अजीर्ण

  • भूक न लागणे, अपचन होणे, आंबट ढेकरा येणे यावर उपाय म्हणून अर्धा ग्लास पाण्यात एक लिंबू पिळून साखर मिसळून नेहमी प्यावे.
  • एक चमचा आल्याचा रस, लिंबू, पादेलोण (सेंधा मीठ) एक ग्लास पाण्यात मिसळून प्यावे.
  • अननसाच्या फोडी वर मीठ व काळे मीठ टाकून खाल्ल्याने होते अजीर्ण दूर होते.
  • पपई खाल्ल्याने पण अजीर्णा-मध्ये आराम येतो.
  • एक चमचा कांद्याचा रस दोन दोन तासाने घेतल्याने अजीर्ण बरे होते.
  • लाल कांद्यावर लिंबू पिळून जेवताना खाल्ल्याने अजीर्ण दूर होते.
  • लहान मुला अजीर्ण झाल्यास पाच थेंब कांद्याचा रस दिल्याने आराम येतो.

आव पडणे

  • दही भात, खडीसाखरे बरोबर खाल्ल्याने आराम घेतो
  • मेथी दाण्याचे चूर्ण तीन ग्राम दह्यात मिसळून खावे. यामुळे सारखे लघवी लागणे पण बंद होते.
  • १० ग्रॅम धाण्या बरोबर २५ ग्रॅम काळे मीठ वाटून घ्यावे. जेवणानंतर अर्धा चमचा फक्की मारून वरून पाणी प्यावे दोन तीन तासातच आराम येतो.

पोटातील गॅस

  • एक गोड सफरचंद घेऊन त्यात दहा ग्रॅम लवंग टोचून ठेवावेत. दहा दिवसांनी लावून काढून तीन लवंग रोज खावेत. सोबत एक सफरचंद खावे. तांदुळाचे पदार्थ खाऊ नयेत.

गोळा सरकणे (बेंबी सरकणे)

  • जेव्हा बेंबी आपल्या जागेवरून सरकून जाते तेव्हा पोट जोरात दुखते. जोपर्यंत बेंबी आपल्या मूळ स्थानावर येत नाही तोपर्यंत पोट दुखत असते यामुळे हगवण पण लागते पुढे वाकला व वजन उचलत उचलण्यास त्रास होतो. बेंबी जागेवर आणावयास पाहिजे. त्यानंतर दोन्ही पायांच्या अंगठ्यात काळा दोरा बांधून घ्यावा. त्याने बेंबीचे सरकणे बंद होते.
  •  20 ग्रॅम बडीशेप, 20 ग्रॅम गुळात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. याने सरकलेली बेंबी जागेवर येते.
  • बेंबी वर सरसों तेल चोळल्याने आराम येतो. फार जोरत दुखत असल्यास तेल चोळून त्यावर कापुस ठेवून कपडाची पट्टी बांधावी.
तर मित्रांनो, वर दिलेले सर्व आजार पोटा-संबंधित आहे. तसेच त्यांचे घरेलू उपचार दिलेले आहेत या सर्व उपचारांचे कोणतेही साइड इफेक्ट नाही.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post