फुप्फुसाचे रोग व त्याचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Homeopathic Treatment Of Lung Disease And Its Home Remedies - घरचा वैद्य-तुमचे आरोग्य,तुमच्या हातात
हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, जसजसे वातावरण बदलते तसतसे आपल्या शरीराच्या आत बदल होणे स्वाभाविक आहे. नीट काळजी न घेतल्याने आपल्याला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण फुफ्फुसाच्या रोगाबद्दल तसेच त्यावरील घरेलू उपचार बद्दल जाणून घेणार आहोत. त्यात खोकला, उचकी, सर्दी पडसे, क्षय रोग, दमा, कफ विकार इत्यादींचा समावेश आहे चला मित्रांनो जाणून घेऊया

फुफ्फुसा सम्बंधित सर्व आजार व त्यांचे घरेलू उपचार

खोकला

  • सहा-सात काळ्या मिऱ्या वाटून मधात कालवून चाटल्यास खोकल्यात आराम येतो. हा प्रयोग रात्री करावा व नंतर पाणी पिऊ नये.
  •  २०० ग्रॅम कांदा, २ ग्रॅम आले, १० ग्रॅम काळीमिरी, ४-५ नग मोठी पिंपळ, २५० ग्रॅम खडीसाखर घेऊन सगळ्यांना वाटून मिसळून घ्यावे. नंतर त्यात पूर्ण भिजेल इतके तूप घेऊन चांगले गरम करावे. चांगले शिजल्यावर हे मिश्रण दिवसात तीन वेळा दोन-तीन चमचे घ्यावे. प्रत्येक वेळी गरम करूनच खावे दोन-तीन दिवसातच आराम येईल.
  • पादेलोणाचा  एक खडा आगीत तापवावा. नंतर चिमट्याने धरून अर्धा पेला पाण्यात बुडवून काढून घ्यावा. नंतर ते पाणी पिऊन घ्यावे.
  • दहा ग्रॅम आल्याचा रस, 10 ग्रॅम मधात गरम करून दिवसातून दोन वेळा प्यावे. दमा, खोकला यात उत्तम औषध आहे. आंबट खाऊ नये.

उचकी

  • उचकी सुंठ पाण्यात उगाळून हुंगल्याने उचकी थांबते.
  • आल्याचे लहान लहान तुकडे करून चघळावे.
  • पेटलेल्या कोळश्यावर कापूर टाकून हुंगल्याने उचकी थांबते.

सर्दी पडसे

  • सर्दी पडसे रात्री भोजन केल्यानंतर आणि झोपायच्या एक तास अगोदर एक ते दीड ग्लास ताजे पाणी प्यावे, नंतर झोपायच्या अगोदर 100 ग्रॅम गूळ खावा. गुळ खाल्ल्यानंतर मुळीच पाणी घेऊ नये फक्त फक्त चूळ भरावी, सकाळपर्यंत सर्दी-पडसे बरे होते.
  • रोज सकाळी सात आठ तुळशीचे पाने आणि दोन काळीमिरी खाल्ल्याने कधीच सर्दी-पडसे होत नाही.
  • त्यांना सारखे पडसे होत असते अशांसाठी एक उत्तम उपाय ज्या दिवशी हा उपाय करायचा असेल त्या संध्याकाळी साधे-हलके जेवण करावे. त्याआधी दोन-तीन दिवस मसालेदार, तळलेले पदार्थांचे सेवन बंद करावे. संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी रात्री गव्हाच्या पिठात थोडा गूळ टाकून त्यात थोडे तूप टाकून कणके सारखे मळावे. त्याची जाड पोळी लाटून तव्यावर उलटून-पालटून, कपड्याने दाबून शेकावी. चांगली कुरकुरीत शेकून झाल्यावर गरम खावी त्यानंतर पाणी पिऊ नये.

क्षयरोग (टीबी / TB )

  • लसूण सोलून वाटून पाण्यात मिसळून ठेवावे .रोग्यास दोन-तीन चमचे दिवसात तीन वेळा दिल्यास या रोगात फायदा होतो.
  • क्षय रोग्यास फ्लॉवरचे सूप पाजल्याने आराम येतो.
  • मनुका, पिंपळ, खडीसाखर समप्रमाणात वाटून सकाळी संध्याकाळी खाल्ल्याने क्षयरोगात आराम येतो.
  • समुद्री कासवाचे तेल पाच थेंब घेऊन सकाळी पाण्याबरोबर तीन दिवस घेतल्याने या रोगात आराम येतो.
  • एक चांगले केले घेऊन त्याचे साल न काढता त्यात छिद्र करावे. त्या छिद्रात थोडेसे सेंधा मीठ आणि काळी मिरी चूर्ण करून चांदण्या रात्रीत रात्रभर ठेवावे. सकाळी त्याला आगीत शेकून खावे. शरद पौर्णिमेच्या रात्री ठेवलेले केळे दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने विशेष फायदा होतो.
  • अखंड इसबगोल घ्यावा. त्यात सत किंवा भुसा नको. याला साफ करून सकाळ संध्याकाळ १०-१० ग्रॅम पाण्याबरोबर घ्यावे. एका महिन्यात आराम येतो. पश्चात तांदूळ, तळण, तेल, आंबट पदार्थ घेऊ नये. बरे झाल्यानंतरही सहा महिने पथ्य पाळावे.

कफ विकार 

कधी - कधी कुठले गरम पेय किंवा गरम औषधाच्या सेवनामुळे कफ वाळून छातीत जम धरतो. असा वाळलेला कफ फार मुश्किलीने निघतो. खोकतांना किंवा खाकरतांना फार त्रास होतो. छातीतून घर घरं असा आवाज येतो.
  •  आले सोलून वाटाण्याएवढा तुकडा चघळावा . त्याने के निघण्यास मदत होते.
  • ज्येष्ठमध , कोरडा आंवळा वेग - वेगळा वाटून घ्यावा. दोघांना गाळून मिसळून ठेवावे. हे चूर्ण एक चमचा दिवसात दोन वेळा किंवा सकाळी रिकाम्यापोटी पाण्याबरोबर घेतत्याने छातीत जमलेला कफ मोकळा होतो.
तर मित्रांनो वर सर्व फुफ्फुसाचे आजार व त्यांचे घरेलु उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post