डोळ्यांचे रोग व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Eye Diseases And Their Home Remedies - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, डोळ्यांचे रोग व त्यांचे घरेलू उपचार - आजच्या या नवीन पोस्टमध्ये आपण डोळ्यांचे वेगवेगळे आजार व त्यांचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

डोळ्यांचे रोग व त्यांचे घरेलू उपचार

कमजोर नजर

  • अर्धा चमचा ताजे लोणी, अर्धा चमचा वाटलेली खडीसाखर व पाव चमचा काळी मिरीपूड मिसळून चटावी. नंतर कच्च्या नारळाचे खोबरे दोन-तीन तुकडे खाऊन थोडी शोप चांगली चावून-चावून खावी. हा प्रयोग सकाळी रिकाम्या पोटी दोन-तीन महिने करावा.
  • सूर्योदयाच्यावेळी हिरव्यागवतावर अनवाणी पायांनी चालावे. गवतावर रात्रभर पडणाऱ्या दवां मुळे, आद्रता असते. त्यामुळे नेत्रज्योती वाढते व शरीरालाही लाभ मिळतो.
  • स्वमूत्रने डोळे धुवून अर्ध्या तासाने थंड पाण्याने परत धुवावे. हा उपाय नियमित सकाळी केल्याने डोळ्याचे अनेक रोग नष्ट होतात. चष्म्याचा नंबर ही कमी होतो. काही दिवसांनी आठवड्यातून दोन वेळा केले तरी चालेल.
  • दररोज मधाबरोबर ताज्या आवळ्याचा रस घेतल्याने नेत्रज्योती वाढते, मोतीबिंदू व इतर डोळ्यांच्या रोगात लाभ होतो.

डोळ्याखालचे काळे घेरे

  • पोट खराब असणे, असंतुलित भोजन घेणे, मानसिक ताण, लिव्हर खराब असणे इत्यादी कारणांमुळे डोळ्याखाली काळे पडतात. ही कारणे दूर केल्याने हळूहळू हे काळे घेरे पण कमी होत जाते.
  • दररोज दुधाची साय काळ्या घेरयांवर नियमित लावावे. कच्चा बटाटा मधोमध कापून डोळ्यांवर ठेवून लेटावे. अर्ध्या तासानंतर पाण्याने धुवून घ्यावे.
  • काकडीच्या फोडी या घेरयांवर घासल्याने काळेपणा दूर होतो. गाजराच्या मौसमात गाजर किसुन घेरयांवर लावावे. पंधरा-वीस दिवस हा उपाय करा करावा.

डोळे येणे (कंजेक्टिवाइटिस)

  • उन्हाळ्यात डोळे लाल होणे, दुखणे, खाजवणे इत्यादी विकार होतात. याकरता गाईचे कच्चे दूध ड्रॉपर ने डोळ्यात टाकावे. दोन-तीन दिवस आंबट-तिखट खाऊ नये.

डोळे दुखणे

  • डाळिंब वाटून डोळ्यांवर बांधल्याने दुखणे थांबते.
  • चिमूटभर अफू गरम पाण्यात मिसळून पापणीवर लावावे. डोळे दुखी थांबते.
  • दुखऱ्या डोळ्यात आंबट द्राक्षांचा रस दोन दोन थेंब टाकल्याने डोळे बरे होतात.

डोळ्यातून सारखे पाणी येणे

  • मोहर्‍या मधात मिसळुन हुंगल्याने डोळ्यातून पाणी यायचे थांबते.
  • पेरू आगीत भाजून खाल्ल्याने डोळ्यातून पाणी यायचे थांबते.
  • 60 ग्रॅम सरसोच्या तेलात लसूण तळून त्या तेलाने छातीवर व गळ्याच्या आसपास मालिश केल्याने तीन दिवसात डोळ्यातून पाणी वाहने थांबते.

डोळ्यात खाज

  • द्राक्षांचा रस काढून गरम करून आटवावा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावा. रात्री डोळ्यात अंजन म्हणून लावल्याने डोळ्याची खाज बंद होते.

डोळ्यात पुळी होणे

  • मातीच्या कच्च्या भिंतीवर कोळशाचे तुकडे चिटकलेली असतात. असा एक तुकडा घेऊन स्वच्छ दगडावर पाण्याबरोबर उगाळणे. नंतर हा लेख सफाईने फक्त पुळीवरच लावावा. लगेचच थोड्यावेळात सगळाताण संपवून पुळी बरी होते. जननेंद्रिय न धुतल्यानेही हा रोग होतो. स्नान करताना दररोज आपले जननेंद्रिय धुतले पाहिजे.

डोळ्यात धुरकट पणा

  • या विकाराच्या प्रारंभिक अवस्थेत आवळ्याचा रस जराश्या पाण्यात मिसळून सकाळ-संध्याकाळ प्यायल्याने फायदा होतो.
  • कच्चा बटाटा स्वच्छ दगडावर व उगाळून सकाळ-संध्याकाळ लावल्याने डोळ्यातला धुरकटपना बरा होतो.
  • पांढऱ्या कांद्याचा रस डोळ्यात लावत राहिल्याने नेत्रज्योती वाढते व इतर रोग दूर होतात.
  • कापसाची वात कांद्याच्या रसमधे भिजवून घेणे. या वातीला तिळाच्या तेलात पेटवून त्याचे काजळ तयार करून लावल्यास धुरकटपणा जातो.

मोतीबिंदू

  • प्रारंभिक अवस्थेत मध दररोज एक थेंब डोळ्यात टाकल्याने एका महिन्यातच फरक पडतो. मधामुळे बुबुळांची पारदर्शीता वाढते. डोळ्यांवरचा ताण कमी होतो. माधाच्या नियमित प्रयोगाने नेत्रज्योती वाढते व इतर विकारही दूर होतात.
  • दहा ग्रॅम पांढ-या कांद्याचा रस, दहा ग्राम मध, भीमसेनी कापूर तिघांना मिसळून एक बाटलीत भरून ठेवा. रात्री झोपतांना डोळ्यात लावल्याने मोतीबिंदू वाढायचा लगेच थांबतो.

चष्म्यापासून मुक्ती

  • 250 ग्रॅम बदाम, 50 ग्रॅम खसखस व दहा ग्रॅम काळी मिरी वाटून शुद्ध तुपात भाजून घ्यावे. त्यात 100 ग्राम वाटलेली खडीसाखर मिसळून घ्यावी. रोज सकाळी रिकाम्या पोटी दोन चमचे घेतल्याने नेत्रज्योती वाढते व सहा महिन्यात चष्मा उतरतो.
महत्त्वाची सूचना :- मंदाग्नी व मधुमेहाच्या रोग्यांनी हा उपाय करू नये.

तर मित्रांनो वर सर्व डोळ्यांचे रोग व त्यांचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post