[Foot care for diabetic patients]

हॅलो नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांच स्वागत आहे घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये,
मधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या होऊ शकतात व त्यामुळे होणारे परिणाम हे खुपच भयानक असतात. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपणा सोबत मधुमेह आणि पायाची काळजी अर्थात मधुमेही रुग्णांनी पायाची काळजी कशी घ्यावी? याबद्दल माहिती देणार आहोत.

मधुमेही रुग्णांसाठी पायाची काळजी घरचा वैद्य
मधुमेही रुग्णांसाठी पायाची काळजी

मधुमेही आणि पायाची काळजी

  • जर तुम्हाला पायाची समस्या जाणवत असेल तर त्यासाठी तातडीने उपचार घ्या. आपल्या आहारातील साखरेचे नियंत्रण हा महत्त्वाचा उपाय आहे. पण त्याआधी आपण या गोष्टीवर लक्ष द्यायला हवे की आपणास जखम होऊ नये. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त काळजी घ्यावी लागेल.
  • मधुमेही रुग्णांनी घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे. कारण चालताना खरचटणे, ठेच लागणे यासारख्या छोट्या समस्या ही धोक्याचे ठरू शकतात. त्यामुळे पादत्राणे घराबाहेर जाताना घालूनच फिरावे.
  1. चप्पल घातल्यानंतरही जखम होण्याची शक्यता असते, अशावेळी आपण बुटांचा वापर करू शकतात. हे चप्पल पेक्षा जास्त फायदेशीर ठरेल.
  • पायांची स्वच्छता हा यातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. यासाठी कोमट पाणी आणि साबनाचा वापर करून पायाची नियमित स्वच्छता करावी. पाय धुतल्यानंतर कोरडे करून घ्यावे सोबतच बोटांमधील भागही कोरडा करावा व डॉक्टरांच्या सल्ल्याने अनुसार मलमाचा वापर करावा.
  • अधिक महत्त्वाचे म्हणजे नखे नियमीत कापावी आणि नखांच्या कळा हळूवार घासून काढाव्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की नखे जास्त बारीक कापून नका तसेच नखे कापण्यासाठी ब्लेड चा वापर करू नये. नेलकटर चा वापर करावा. त्याचबरोबर नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
  • कधीकधी आपल्या पायांवर फोड, चट्टे, लालसरपणा किंवा नखांचे जंतुसंसर्ग यासारखे परिणाम दिसतात. त्यामुळे आपण दररोज पाया ची तपासणी करावी.
  • पायाच्या मापाची आणि मऊ चपलांचा वापर करावा व रात्री झोपताना पातळ पायमोजे पायात घालावे.
  • मित्रांनो आपल्याला आपल्या पायाची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच पायाचा तळवा पाहण्यासाठी पायाखाली आरसा धरावा. एक गोष्ट लक्षात ठेवा मधुमेही रुग्णांना पायाला जखम झाल्यास घरगुती उपचार करणे ऐवजी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.

मित्रांनो, या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे. तरीही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर वैद्यकीय तज्ज्ञांकडून खात्री करून घ्यावी.

आपल्याला आजचा हा पोस्ट कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा कारण कमेंट बॉक्स आपलाच आहे. आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आजच घरचा वैद्य तुमचे आरोग्य तुमच्या हातात या ब्लॉग वेबसाईट ला सबस्क्राईब करा.

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटूया नवीन पोस्टमध्ये तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post