इतर शरीरिक रोग व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Other Body Diseases And Home Remedies - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण इतर शरीरिक रोग व त्यांचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

इतर शरीरिक रोग व त्यांचे घरेलू उपचार

कावीळ

  • मूळ्याचा पानांचा रस 100 ग्रॅम, 20 ग्रॅम साखरेत मिसळून सकाळी 5 - 20 दिवसापर्यंत प्यावा. आंबट खाऊ नये.
  • वाटाण्या एवढी तुरटी आचेवर शेकून फुगवुन घ्यावी व वाटून चूर्ण करावे. एक पिकलेले केळे मधून कापून दोन फोडी कराव्या. यावर चुर्ण शिंपडून फोडी आपसात पुन्हा जोडून सकाळी रिकाम्या पोटी खावे. सात दिवस असे केळे रोज खाल्याने कावीळ बरी होते.

पक्षाघात (पॅलिसिस)

  • हींग, सुंठ, काळी मिरी, पिंपळ, लाहोरी मीठ समप्रमाणात घेउन चूर्ण करुन घ्यावे. वस्त्रगाळ करून तीन ग्रॅम चूर्णात तीन लसणाच्या पाकळ्या वाटून मिश्रण करावे. आणि सकाळी दूधा बरोबर नियमितपणे घ्यावे. हे औषध कंबर दुखी, हात - पाय व तोंडाला होणाऱ्या पॅरेलिसिस मधे उपयोगी आहे. तोंडाच्या पक्षाघातात लसूण व चूर्णाबरोबर तीन ग्रॅम लोणी मिसळून खाल्याने लवकर फायदा होतो.
  • उडदाची डाळ वाटून तुपात भाजावी. त्यात गुळ, सुंठ वाटून मिसळावे व लाडू तयार करून घ्यावे. एक लाडू दररोज खाल्याने पक्षाघात बरा होतो. 
  • अर्धाकप उकळत्या पाण्यात दोन चमचे मध टाकून थंड करून प्यावे. एका महिन्यातच प्रभावी अवयव काम करू लागतात. 

उन लागणे 

  • काळी तुळशीच्या फुलांना थंड पाण्या बरोबर सेवन केल्याने उन लागायची शक्यता नसते. उन लागल्यावर मेथी ची हिरवी पाने वाटून अंगावर ५ चोळल्याने आराम येतो. 
  • कच्या कैरीला गरम राखेत दाबून भाजावे. त्याचा गर काढून खडीसाखर घालून प्यायल्याने उन लागलेले असता लवकर आराम येतो.

हैजा

  • या रोगापासून बचावासाठी 25 ग्रॅम कांद्याचा रस, एक कप पाणी, एक लिंबू, मीठ, काळी मिरपूड, आणि आल्याचा रस मिसळून पाजल्याने अथव पीत राहिल्याने हा रोग होत नाही. 
  • 25 ग्रॅम आंब्याची कोवळी पाने वाटून एक ग्लास पाण्यात उकळावी. पाणी अर्धे उरल्यावर गाळून दिवसातून दोन वेळा प्यावे. 
  • एक चमचा लिंबाचा रस, हिरवा पोदीना, कांद्याचा रस अर्धा अर्धा चमचा मिसळून सारखे पित राहिल्याने आराम येतो. 
  • पाव कप काल्याचा रस तेवढयाच पाण्यात थोडे मीठ कालवून सारखे पाजल्याने आजारात आराम येतो.

अनिद्रा 

  • डोक्याची आणि तळ पायाची राईच्या तेलाने मसाज केल्याने चांगली झोप येते. 
  • 6 ग्रॅम खसखस, 250 ग्रॅम पाण्यात वाटून कापडाने गाळून त्यात 25 ग्रॅम खडीसाखर घालून सकाळी व संध्याकाळी ( 4 - 5 वाजतां ) घ्यावी. नियमितपणे घेतल्याने अनिद्रा रोग नेहमीसाठी नाहीसा होइल.
तर मित्रांनो वर इतर शरीरिक रोग व त्यांचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post