जीवनसत्वे व जीवनसत्वांची ओळख घरचा वैद्य  Introduction Of Vitamins - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण जीवनसत्वे व जीवनसत्वांची ओळख जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

जीवनसत्वे व जीवनसत्वाची ओळख

जीवनसत्व ' अ ' 

स्रोत:- चवळी , पत्कोनी, पत्ताकोबी, कोथींबीर, मुळ्याची पाने, पुदीना, मेथी, गाजर, अंबे, दही या खाद्य पदार्थातून  ' अ ' जीवनसत्वे मीळते.

अभावामुळे होणारे रोग :- या जीवन सत्वाच्या अभावामुळे दृष्टीदोष, दृष्टी कम रातांधळेपणा, डोळ्यांची आग होणे व दात हाळणे इत्यादी रोग उद्भवतात.

जीवनसत्व ' ब ' 

स्रोत:- पत्ताकोबी, गाजर, अंडे, यकृत, दुध, हिरव्या पालेभाज्या, खमीर, आंबवलेल्या कणकेचे पदार्थ यापासून आपणास ' ब ' जीवन सत्व मीळते .

अभावामुळे होणारे रोग :- याच्या अभावामुळे आपण वारंवार आजारी पडणे, अंग जड पडणे, हात - पायाला मुंग्या व झीणझीण्या येणे, तसेच स्त्रियांच्या गर्भाशयात दोष निर्माण होणे, अशी रोगे उद्भवतात , 

जीवनसत्व ' क ' 

स्रोत:- संत्री, मोसंबी, लिंबु, आवळा यांचे सेवन केल्याने  आपणास ' क ' जीवन सत्व मीळते

अभावामुळे होणारे रोग :- ' क ' जीवनसत्वाच्या अभावामुळे चेहरा पीवळसर होणे, निस्तेज होणे, हिरड्या सुजणे, स्वभावात चिडचिडेपणा येणे, सर्दी, खोकळा, फ्ल्यु इत्यादी विकार उद्भवतात.

जीवनसत्व ' ड ' 

स्रोत:-  शार्क माशाचे तेल, यकृत, अंडी यापासुन ' ड ' जीवनसत्वाची पूर्ती होते. तसेच याचे उत्तम स्रोत सूर्याचा कोवळा प्रकाश आहे.

अभावामुळे होणारे रोग :- या जीवनसत्वाच्या आभावामुळे दंत रोग, अस्था रोग बेडौल पणा, हाडांची दुर्बलता किंवा जास्त वाढ अशी लक्षण आढळतात. यासाठी सुर्यप्रकाश अत्यंत जरूरीचा आहे. 

जीवनसत्व ' इ ' 

स्रोत:-  ' ई ' जीवन सत्व सोयाबीन, पालक, टमाटे, कोबी, व मधुन मीळते. 

अभावामुळे होणारे रोग :-याच्या अभावामुळे पुरुषामध्ये नपुंसकत्व व स्त्रिया मध्ये वांझपण हे दोष आढळतात . यासाठी हिरवा भाजीपाळा, ज्वारी, वाटाणे, जव भात यांचे सेवन करणे सोईचे असते.


आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post