हृदय तथा रक्त - संस्थांचे रोग व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Cardiovascular Disease And Their Home Remedies - घरचा वैद्य-तुमचे आरोग्य,तुमच्या हातात
हैल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आपल्या शरीरात ह्रदय सर्वात महत्वाचा आहे कारण हृदयामुळेच आपल्या शरीरात रक्त संचरण प्रक्रिया पार पडली जाते. यामुळे आपल्याला आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे. आजच्या या पोस्ट मधी आपण हृदय तथा रक्त - संस्थांचे रोग संबंधित सर्व आजार तसेच त्याचे घरेलु उपचार पाहणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

हृदयरोग तथा रक्त - संस्थांचे रोग व त्याचे घरेलु उपचार

हृदयरोग

  • सफरचंदाचा मुरंबा 50 ग्रॅम, चांदीचा वर्ख लावून सकाळी-सकाळी सेवन करीत राहिल्याने हृदयाची अशक्तता वगैरे व्याधींवर आराम येतो.
  • अर्ध्या जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यात थोडासा आवळ्याचा रस टाकून प्यावा. नंतर जेवण करावे २१ दिवस पाठोपाठ हा उपाय केल्याने हृदयाचा अशक्तपणा दूर होतो.
  • कच्च्या बटाट्याचा रस्सा ने हृदयात होणारी जळजळ थांबते. खडी साखरे बरोबर पिकलेल्या चिंचेचा रस प्यायल्याने पण जळजळ थांबते.
  • त्यांच्या हृदयाच्या धडकण्याचा वेग सामान्य पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी जेवणासोबत एक कच्चा कांदा खाल्ल्यास आराम येतो. व हृदयास ताकद मिळते.
  • वाटलेला आवळा गाईच्या दुधाबरोबर प्यायल्याने हृदय रोगांमध्ये आराम येतो.
  • कोरडा आवळा व खडीसाखर समप्रमाणात घेऊन वाटून घेणे एक चमचा चूर्ण रोज पाण्याबरोबर घेतल्याने हृदय रोगात फायदा होतो.
  • 15 ग्रॅम मधात २ केळी मिसळून खाल्ल्याने आराम येतो, लीची चे फळ उत्तम स्वास्थ्यवर्धक आहे ते हृदयास शक्ती देते.

उच्च रक्तचाप (हाय ब्लडप्रेशर)

  • खसखस आणि टरबुजाच्या बियांचा गर वेगवेगळे वाटून समप्रमाणात मिसळून ठेवावे. व सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी खाल्ल्याने वाढलेला रक्तदाब कमी होतो तसेच रात्री झोपसुद्धा चांगली लागते.
  • एक चमचा मेथीच्या दाण्याची चूर्ण सकाळी-संध्याकाळी रिकाम्यापोटी घेतल्याने (आठवडाभर) उच्च रक्तचाप कमी होतो.
  • मनुका सोबत लसणाची पाकळी खाल्ल्याने आराम येतो.
  • फांदीवर पिकलेली पपई तीस दिवस सकाळी रिकाम्यापोटी खावे. त्यानंतर दोन तास काही खाऊ पिऊ नये.
  • गहू व चने समप्रमाणात घेऊन दळून घ्यावे. या पिठाच्या पोळ्या खाव्या एका आठवड्यात आराम येतो.
  • रात्री एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे. सकाळी उठून तेच पाणी प्यावे. त्याने रक्तचाप सामान्य होतो.
  • तुळशीची चार पाने, लिंबाची दोन पाने ,दोन चमचे पाणी घेऊन एकत्र वाटावे रिकाम्या पोटी घेतल्याने उच्च रक्तचाप आराम येतो.

निम्न रक्तचाप (लो ब्लड प्रेशर)

  • 100 ग्रॅम किसमिस, 200 ग्रॅम पाण्यात रात्रभर भिजवावी. सकाळी एक-एक किसमिस चांगली चावून-चावून खावी लो-ब्लडप्रेशर सामान्य होतो.
  •  लो-ब्लडप्रेशर मुळे मूर्छा आल्या आवळ्याच्या रसात समप्रमाणात मध कालवून २-२ चमचे देत राहिल्याने मूर्छा दूर होतो.
  • ताकात २ ग्रॅम हिंग मिसळून घेतल्याने लो ब्लडप्रेशर सामान्य होतो. दुपारी जेवणानंतर ताक घेणे अतिउत्तम.
  • गाजराचा रस मध घालून घेतल्याने पण फायदा होतो. गाजराचा मुरंबा पण फायदेकारक असतो.
तर मित्रांनो वर सर्व हृदय तथा रक्त - संस्थांचे रोग व त्यांचे घरेलु उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post