मोठ्या कामाच्या लहान लहान गोष्टी - आरोग्यविषयक आणि सवयी - घरचा वैद्य-तुमचे आरोग्य,तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो आज आपण आरोग्यविषयक आणि सवयीन बद्दल अशी लहान लहान गोष्टी शिकणार आहोत ज्या आपल्या आरोग्यासाठी व आपल्यासाठी खूपच फायद्याच्या आहेत खालील गोष्टी आपण न विसरता नियमित लक्षात ठेवावे. आपल्या आरोग्यासाठी व आपल्यासाठी हे खूपच लाभदायक आहे

ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

  • पाच कामे नेहमी योग्य वेळी केली पाहिजेत. सकाळी लवकर उठणे, शौचास जाणे, स्नान, जेवण आणि झोपणे शरीर स्वस्थ ठेवण्याचा हा मूलमंत्र आहे. 
  • सकाळी उठल्याबरोबर दात स्वच्छ करून किंवा चूळ भरून एक पेला थंड पाणी प्यावे. नंतर एक पेला कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यावे व नंतर शौचास जावे. 
  • मल, मूत्र, शिंक, अश्रू, जांभई, झोप, उलटी, ढेकर, भूक, तहान, अपान वायु व श्रमाने झालेला श्वास वेग ही स्वाभाविक वेग आहेत या वेगांना रोकु नये.
  • कमी खाणे हे नेहमी स्वास्थ्या करिता चांगले. भूकेपेक्षा एक पोळी कमी खाल्याने पोट ठिक राहते. धैर्याने काम केल्यास बुद्धि ठिक राहते. पोट व बुद्धी ठीक राहिल्यास माणूस स्वस्थ राहतो.
  • अन्न ग्रहण केल्यावर लगेच झोपणे. किंवा श्रम करणे, जेवतांना काळजी करणे, जेवतांना बोलणे व जेवल्यावर लगेच पाणी पाल्याने अपचन व अजीर्ण होते.
  • भूक असल्यावर न जेवणे, भूक नसल्यावर भोजन करणे, न चावता गिळणे, जेवल्यावर तीन तासाच्या आत परत जेवणे व भुके पेक्षा अधिक जेवणे प्रकृतिला चांगले नसते. बघितल्या शिवाय पाणी पिऊ नये. जाणल्या शिवाय मित्रता करू नये, हात धुतल्या शिवाय जेवू नये, विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये, आपल्यापेक्षा मोठ्याचा तिरस्कार करू नये,बलवानांशी शत्रुता व दुष्टांशी मित्रता करू नये, अनोळखी माणसावर एकदम विश्वास करू नये. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्यास अनेक व्याधि आणि विपत्ति पासून बचाव होऊ शकतो.
  • अतिव्यायाम; अति थट्टा विनोद, आति बोलणे, अति परिश्रम, अति जागरण, अति मैथुन ह्या गोष्टींचा अभ्यास असला तरी आति कारणे योग्य नाही. कारण अति करणे आज ना उद्या कष्ट कारकच ठरते.
  • या जगात असा कुठलाही पदार्थ नाही जो योग्य प्रमाणात व रितीने प्रयोग केल्यास औषधाचे काम करणार नाही. योग्य रितीने व योग्य प्रमाणात जेवण न केल्यास त्याचे ही विष होऊ शकते. हिवाळ्यात सकाळी उन घेणे व रात्री थंडी  पासून बचाव करणे हितकारक असते. परंतू उपाशी राहणे व उशीरा पर्यंत जागणे नुकसानकारक असते.
  • झोपावयास जाण्या अगोदर लघवी करणे, गोड दुध पिणे, दात घासून चुळ भरणे, हात पाय धुणे, दिवसाभर केलेल्या कामावर मनन करून ईश्वराचे ध्यान करत झोपणे मानसिक आणि शारिरिक स्वास्थासाठी हितकार असते. जेवताना आणि झोपतना मन एकाग्र असावे. जेवताना सॅलेड म्हणून गाजर, मुळा, काकडी, कांदा, कोबी, कोथिंबीर, मुळ्याची पाने, पालक इत्यादी जे काही उपलब्ध असेल ते बारीक सॅलेड करून खावे.
मित्रांनो, वरील सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी तसेच आपल्या साठी खूपच महत्वाच्या आहेत. ह्या सर्व गोष्टींचे आपल्याला नेहमी पालन करने गरजेचे आहे. 

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post