भोजनातील हानिकारक संयोग  आरोग्य विषयक टिप्स - घरचा वैद्य-तुमचे आरोग्य,तुमच्या हातात
 हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये मित्रांनो आज आपण भोजनातील हानिकारक संयोगांबद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

कधी कधी आपण जेवणात अशा पदार्थांचे सेवन करतो की ज्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहोचते. आजच्या या पोस्टमध्ये आपण जेवणातील हानिकारक संयोग याबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया, की कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यावर कोणते पदार्थ खाऊ नये.


भोजनातील हानिकारक संयोग

  • दुधा सोबत-दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गुळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधा सोबत हानिकारक आहेत.
  • दह्या सोबत- दूध, खीर, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मुळा इत्यादी घेऊ नये.
  • तुपा सोबत- थंड दुध, थंड पाणी, सम प्रमाणात मद्य हानिकारक असते.
  • मधा सोबत- मुळा, खरबूज, सम प्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
  • फणसा नंतर पान खाणे हानिकारक असते.
  • मुळ्या सोबत- गुळ खाणे नुकसानदायक असते.
  • खीरी सोबत- खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
  • गरम पाण्याबरोबर मध घेऊ नये.
  • थंड पाण्या बरोबर- शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.
  • कलिंगडा बरोबर- पोदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
  • चहा सोबत- काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
  • माशा सोबत- दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
  • मांसा सोबत- मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
  • गरम जेवणाबरोबर- थंड जेवण व थंड पेये हानिकारक असतात.
  • खरबुजा बरोबर- लसून, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसान कारक असते.
  • तांबे, पीतळ किंवा कांशाच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार भाज्या इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. तसेच ऍल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पाताळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
तर मित्रांनो, वरील दिलेले सर्व भोजनातील हानिकारक संयोग आहेत. या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या आरोग्यासाठी काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे. कोणतेही असे पदार्थ खाऊ नये, ज्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहोचेल.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post