हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण शारीरिक दर्द आदि रोग व त्यांचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण शारीरिक दर्द आदि रोग व त्यांचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
शारीरिक दर्द आदि रोग व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य
सांधे दुखी
- या रोगाच्या प्रारंभी पायाच्या टाचा, गुडघे, हाताची बोटं यांत दुखणे, सूई टोचल्या प्रमाणे दुखणे किंवा जळजळ होणे याचा अनुभव होतो. ही लक्षणे दिसल्याबरोबर सर्वप्रथम पोट साफ ठेवणे आणि अपचन न घेऊ देणे याचा उपाय करावा.
- अश्वगन्धा चे चांगले बारीक कुटून चूर्ण करून घ्यावे. यात समप्रमाणास वाटलेली साखर मिसळावी आणि तीन वेळा वस्त्रगाळ करून बाटलीत भरून ठेवावे. संकाळ - संध्याकाळ 1-1 चमचा ( 5 से 10 ग्रॅम ) फक्की लावून वरून गरम दूध प्यावे. हा उपाय फार फायदेकारक आहे.
- ओवा, शुद्ध गुगल, माल कांगनी, काळे दाणे या चौघांना वेगवेगळे कुटुन चूर्ण करावे, समप्रमाणात चौघांना घेऊन एकत्र करावे आणि थोडे पाणी शिंपडून वाटाण्याएवढया गोळ्या तयार कराव्या 2 - 2 गोळ्या दिवसातून तीन वेळा गरम दूधा सोबत घ्याव्या.
- लसणाच्या रसात कापूर मिसळून मालिश केल्याने संधिवाता चे दुखणे कमी होते.
शरीरावर सूज येणे
- जुना गुळ आणि आल्याचा रस समप्रमाणात घेउन दिवसातून दोन वेळा पाजावे. जो पर्यंत हा उपाय चालू असेत तो पर्यंत रोग्याला जेवणात काही न देता फक्त बकरीचे दूध पाजावे.
हाता - पायावर सूज येणे
- वेलची एक भाग, मोठी हरड चार भाग, बडी शेप आठ भाग व खडीसाखर आठ भाग घ्यावी. चूर्ण करून घ्यावे . एक चमचा चूर्ण रोज सकाळ संध्याकाळ पाण्याबरोबर घ्यावे.
टाचेवर भेगा पडणे
- पाय पाण्याने स्वच्छ धुवून शुद्ध तुपात थोडे से मीठ कालवून भेगां मध्ये भरावे. रात्रभर राहू द्यावे.
- 40 ग्रॅम तिळाच्या तेलात 6 ग्रॅम मेण टाकून गरम करावे. त्यात 10 ग्रॅम राळ वाटून टाकावी. थोड्या वेळाने शेगडी वरून उतरून घ्यावे. मिश्रणाचे लेपन भेगांवर करावे.
गुडघे दुखणे
- तरुणपणी मेथी दाणे सेवन करीत राहिल्याने वृद्धावस्थेत गुडघ्यांचा त्रास होत नाही. मेथी दाण्याचे बारीक चूर्ण एक चमचा सकाळच्यावेळी पाण्यासोबत घेतल्याने गुडघे दुखणे थांबते. ज्यांचे गुडघे सारखे दुखतात त्यांनी रोज या चूर्णाचे सेवन करावे.
- कच्चा बटाटा वाटून त्याचा लेप गुडघ्यावर केल्याने दुखणे थांबते एरंडीची पाने आणि मेंदी वाटून त्याचा लेप केल्याने गुडघेदुखीत आराम येतो.
कंबर दुखणे
- कंबर दुखीचा उपचार चालू असताना, तळलेले पदार्थ, भात उडदाची डाळ, इत्यादि वर्ण्य करावे. उकळलेले पाणी प्यावे. उपाय :-रात्री 60 - 70 ग्रॅम गहू पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी या गव्हात 30 ग्रॅम खसखस व तीस ग्रॅम धणे मिसळून बारीक वाटून घ्यावे . त्यात अर्धा लीटर दूध टाकून उकळावे. हे मिश्रण गरजेनुसार दोन आठवडे लागोपाठ घेत राहिल्याने कंबरेचे दुखणे थांबते.
- जायफळ पाण्यात उगाळून तिळाच्या तेलात मिसळून गरम करावे. चांगले गरम झाल्यावर थंड करून कंबरेवर चोळल्याने दुखणे एकदम थांबते.
- एक चमचा आल्याच्या रसात अर्धा चमचा मध टाकून प्यावे. असे दिवसातून 3 वेळा करावे.
तर मित्रांनो वर शारीरिक दर्द आदि रोग व त्यांचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
Post a Comment
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा