कान आणि नाकाचे आजार व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Ear And Nose Disease And Their Home Remedies - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, कान आणि नाकाचे आजार व त्यांचे घरेलू उपचार घरचा वैद्य - आजच्या नवीन पोस्टमध्ये आपण कान, नाक आणि त्यांचे आजार व त्यावरील घरेलू उपचार याबद्दल जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया

कान आणि नाकाचे आजार व त्यांचे घरेलू उपचार

कान दुखणे

  • लसणाच्या दोन पाकळ्या सोलून वाटून घ्याव्या. नंतर त्यात थोडे शुद्ध तिळाचे तेल घालून गरम करावे. आणि गाळून घ्यावे. कोमट झाल्यावर या तेलाचे दोन-तीन थेंब कानात टाकल्याने आराम येतो.
  • तिळाच्या तेलात थोड्याश्या ओवा टाकून चांगले गरम करावे. हे तेल कोमट झाल्यावर चार-पाच थेंब कानात टाकल्याने कान दुखायचा थांबेल.
  • कांद्याला गरम राखेत भाजून त्याचे पाणी प्यावे. कांद्याचा रस कानात टाकावा.

कान वाहणे

  • तुळशीच्या पानांचा रस, आल्याचा रस, मध, कडू तेल समप्रमाणात मिसळून थोडेसे सेंधा मीठ वाटून त्यात मिसळावे. हे मिश्रण बाटलीत भरून ठेवावे. कोमट करून दोन-तीन थेंब कानात टाकल्याने कान वाहने किंवा पिकने यावर आराम येतो.
  • लहान मुलांचा कान वाहत असेल तर, लसणा बरोबर कडुलिंबाचा पाला पाण्यात उकळावा. ज्या कानात त्रास होत असेल, त्या कानात हे पाणी रात्री झोपताना दोन-तीन थेंब टाकून कापसाचा गोळा घालावा. कान वाहने थांबते. जोपर्यंत पूर्ण आराम येत नाही तोपर्यंत ही क्रिया रोज करावी.
  • दहा ग्रॅम लसूण, सहा ग्रॅम सेंदुरा बरोबर वाटून 100 ग्रॅम सरसो तेलात टाकून उकळावे. तेल अर्धे झाल्यावर चुलीवरून उतरून घ्यावे. आणि गाळून बाटलीत भरून घ्यावे. दोन-तीन थेंब दिवसातून दोन-तीन वेळा वाहत्या कानात टाकल्यास कान बरा होतो.

कानाचे इतर रोग

  • कानात किडा केला असल्यास सरसोचे तेल गरम करून कानात टाकल्याने किडा लगेच बाहेर येतो.
  • कानात मुंगी गेल्यास, तुरटी पाण्यात विरघळून कानात टाकल्याने मुंगी कानातून बाहेर येते.
  • पाण्यात मीठ कालवून कानात टाकून ते पाणी परत काढावे. त्याने कानात गेलेला किडा बाहेर पडतो.
  • गूळ आणि तूप गरम करून खाल्ल्याने कानात होणारे आवाज थांबतात.
  • कानात पाणी गेले असल्यास, गरम तिळाचे तेल टाकल्याने आराम येतो.

नाकातून रक्त येणे

  • डोक्‍यावर थंड पाण्याची धार सोडल्याने नाकातून रक्त येणे लगेच थांबते.
  • दहा ग्रॅम मुलतानी माती बारीक करून रात्रभर अर्धा लिटर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी पाणी निथळून कापडात गाळून घ्यावे. हे पाणी प्यायल्याने नाकातून रक्त येण्याचे थांबते.
  • तीन ग्रॅम सुहागा पाण्यात कालवून दोन्ही नाकपुड्यांवर लेप करावा रक्त येणे तत्काळ थांबते.
  • आवळ्याचे पाणी पाजल्याने किंवा आवळा पाण्यात उगाळून कपाळावर, टाळूवर, नाकावर लेप केल्याने नाकातून रक्त येण्याचे बंद होते.
तर मित्रांनो वर सर्व कान आणि नाकाचे आजार व त्यांचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

1 Comments

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

  1. मला नाकाच्या वरच्या बाजूस कफ साठल्यासारखा वाटतोय व यामुळे स्वास घ्यायला त्रास होतोय
    यावर काही उपाय आहे का

    ReplyDelete

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

Previous Post Next Post