हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, मूत्र विकार व त्याचे घरेलू उपचार - आजच्या या नवीन पोस्टमध्ये आपण मूत्रविकार व त्याचे आजार व त्यांवरील घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, मूत्र विकार व त्याचे घरेलू उपचार - आजच्या या नवीन पोस्टमध्ये आपण मूत्रविकार व त्याचे आजार व त्यांवरील घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला जाणून घेऊया.
मूत्र विकार व त्याचे घरेलू उपचार
लघवीत जळजळणे
- थंड पाण्यात जाड कापड भिजवून पिळून घ्यावा. हे कापड पोटावर बेंबीच्या खालच्या भागावर ठेवून झोपून राहावे. या प्रयोगाने लगेच आराम पडतो.
- सकाळी दूध व पाणी समप्रमाणात घेऊन एक ग्लासात दोन चमचे साखर टाकून चांगले हलवावे व पिळून टाकावे. चहा पिऊ नये. दुपारी एक पेला थंड पाण्यात लिंबू पिळून दोन चमचे साखर मिसळून प्यावे.
- एक ग्लास पाण्यात गुलाबाच्या एक दोन फुलांच्या पाकळ्या टाकून रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी कूचकरून गाळून घ्यावे. त्यात एक चमचा दळलेली खडीसाखर टाकून प्यायल्याने जळजळ थांबते. एक आठवडा सेवन करावे.
- एक मध्यम आकाराचा कांदा कूचकरून 25 ग्रॅम पाण्यात उकळावा. पाणी अर्धे उरल्यावर गाळून पाजावे. दोन दिवस प्रयोग करावा. लघवीची जळजळ थांबेल.
सारखे लघवीला लागणे
- बेलाच्या ताज्या पानांचा रस पाच ग्रॅम दिवसातून तीन वेळा घ्यावा.
- डाळिंबाच्या साली वाटून त्याचे चूर्ण करावे पाच-पाच ग्रॅम दिवसात दोन वेळा घ्यावे.
लघवी थांबणे
- रीठा आणि खरकाच्या बिया समप्रमाणात घेऊन पाण्यात वाटून घ्याव्या. नंतर लिंग व आसपास लेप करून शेकावे। थोड्याच वेळात थांबलेली लघवी बाहेर पडते.
लघवीचे इतर रोग
- मेथी दाणे सहा ग्रॅम वाळवून चूर्ण करून घ्यावे. एक ग्राम मधात कालवून रात्री चाटल्याने थेंब थेंब पडणारी लघवी बंद होते. तीन-चार दिवस प्रयोग करावा.
- 20 ग्रॅम वडाची पाने, पाव लिटर पाण्यात वाटून गाळून घ्यावे. सकाळ-संध्याकाळ हे पाणी घेतल्याने थेंब थेंब लघवी होणे, लघवीतून रक्त येणे थांबते.
- चार ग्रॅम एरंडीचे पाने बारीक वाटून सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर नियमित घेतल्याने बहुमूत्र व रात्री आपोआप लघवी येणे यासारखे विकार बरे होतात.
मधुमेह
- वाळलेले आवळे आणि जांभळाच्या बियांचा गर समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे. रोज सकाळी काही न खाता सात ग्रॅम चूर्ण गाईच्या दुधाबरोबर किंवा पाण्याबरोबर घेतल्याने मधुमेह बरा होतो.
- जांभळाच्या बिया दहा ग्रॅम आणि एक ग्रॅम अफु बारीक वाटून थोडे पाणी मिसळून बारीक गोळ्या तयार कराव्या. एक-एक गोळी सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर घेतल्याने एक महिन्यात मधुमेह बरा होतो.
- मातीच्या भांड्यात पाणी भरून त्यात पळसाची 5 फुले टाकावी. सकाळी फुले कूचकरून शिल्या तोंडाने ते पाणी प्यावे. दर आठवड्याला एक-एक फुल वाढवित राहावे. अनुराधा नक्षत्रात फुले तोडून प्रयोग केल्याने अतिशीघ्र आराम येतो.
तर मित्रांनो वर सर्व मूत्र विकार व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा