हॅलो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, या ताण-तणावाच्या जीवनाचा आपल्या डोक्यावर खूपच वाईट परिणाम होतो. ज्यामुळे आपल्याला डोक्याशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण डोक्याची संबंधित आजार व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
स्वागत आहे आपल्या सर्वांचा घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, या ताण-तणावाच्या जीवनाचा आपल्या डोक्यावर खूपच वाईट परिणाम होतो. ज्यामुळे आपल्याला डोक्याशी संबंधित आजारांचा सामना करावा लागतो. आजच्या या पोस्टमध्ये आपण डोक्याची संबंधित आजार व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत, तर चला मित्रांनो जाणून घेऊया.
डोक्याशी संबंधित आजार व त्याचे घरेलू उपचार
डोकेदुखी
डोकेदुखीची अनेक कारणे असू शकतात बद्धकोष्ट, पोटात गॅस होणे, उच्च रक्तचाप असणे, नजर कमजोर होणे, जागरण, अति परिश्रम, अशक्तता इत्यादी. साधारण डोकेदुखी असल्यास खालील उपाय केले पाहिजेत.
- एका बताश्यावर चार थेंब अमृतधारा टाकून खावे. दोन थेंब रुमालावर अमृतधारा शिंपडून हुंगत राहावे.
- लिंबाच्या पानांचा रस नाकपुड्यात सोडल्याने डोकेदुखी थांबते.
- चंदन पाण्यात कालवून कपाळावर लेप केल्याने उन्हाने होणारी डोकेदुखी थांबते.
- तिळाचे तेल 250 मिली, चंदनाचे तेल 10 मिली, दालचिनी चे तेल 10 मिली आणि कापूर या सर्वांना मिसळून बाटलीत भरून ठेवावे. हे तेल डोक्यास लावल्याने डोकेदुखीत लगेच आराम मिळतो.
- दोन चमचे आवळ्याचे चूर्णात, एक चमचा शुद्ध तूप मिसळून खावे वरून एक पेला कोमट दूध प्यावे.
- रोज सकाळी रिकाम्या पोटी एक सफरचंद कापून, मीठ लावून चावून खाल्ल्याने जुनी डोकेदुखी दूर होते. हा प्रयोग दहा दिवस लागोपाठ करावा.
मेंदूची ताकद वाढवण्यासाठी
- एक किलो गाजर किसून, चार किलो दुधात उकळावे. त्यात 250 ग्रॅम शुद्ध तूप आणि 10 बदाम टाकून भाजावे, आणि काचेच्या भांड्यात भरून ठेवावे. रोज 50 ग्रॅम खाऊन वरून दूध प्यावे. एक महिना लागोपाठ घेतल्याने मेंदू ताकद मिळते.
- एक सफरचंद आगीत भाजून पाण्याच्या कळशीत सोडावे, हे पाणी गाळून प्यावे.
- धने, खसखस समप्रमाणात घेऊन कुटून घ्यावे व बारीक़ चूर्ण करावे. तेवढ्याच प्रमाणात खडीसाखर वाटून त्यात मिसळावी. एक चमचा चूर्ण सकाळी 9:00 वाजता व जेवणानंतर रात्री 9:00 वाजता कोमट बरोबर किंवा पाण्याबरोबर नियमपूर्वक घ्यावे. यामुळे स्मरणशक्ती, नेत्रज्योती वाढते आणि गाढ झोप लागते.
चक्कर येणे
- कोरडा आवळा सहा ग्रॅम, धने सहा ग्रॅम घेऊन त्यांचे कुट करावे. रात्री मातीच्या भांड्यात पाव लिटर पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी मळून व गाळून दोन चमचे वाटलेली खडीसाखर मिसळून प्यायल्याने चक्कर येणे थांबते.
- पोटाच्या गडबडीमुळे जर चक्कर येत असेल, तर अर्धा ग्लास गरम पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने आराम वाटतो.
- 25 ग्रॅम मनुक्का, शुद्ध तुपात परतून, सेंधा मीठ टाकून खाल्याने चक्कर येण्याचे थांबते.
- उन्हाळ्यात चक्कर येत असतील तर, आवळ्याचे सरबत घेतल्याने आराम वाटतो.
अर्धशिशी
- डोक्यात ज्या भागात दुखत असेल त्या बाजूच्या नाकपुडीत 6-7 थेंब सरसोचे तेल टाकल्याने अथवा हुंगल्याने लगेच आराम पडतो. ही क्रिया 4-5 दिवस केल्याने अर्धशिशीचा त्रास कायमचा बंद होतो.
- शुद्ध तुपाचे 2-4 थेंब नाकात सोडल्यास अर्धशिशीचा त्रास कायमचा जातो. हा उपाय किमान एक आठवडा करणे जरुरी आहे.
- लसूण वाटून दुखणाऱ्या भागावर मळल्याने डोकेदुखी लगेच थांबते. हा प्रयोग बऱ्याच वेळा करावा लागू शकतो.
फिट्स
स्नायू संबंधित विकारांमध्ये फिट्स सर्वात भयानक रोग आहे. याचा दौरा कधीही कोठेही पडू शकतो. म्हणुन अशा रोग्यास तलावाजवळ, नदीजवळ, रेल्वे रुळावर किंवा रस्त्यावरून एकटे पाठवू नये, किंवा कुठलेही वाहन चालवू देऊ नये.
- तीन औंस कांद्याचा रस थोडेसे पाणी मिसळून सकाळच्या वेळी प्यायल्याने फिट्सच्या रोगात फायदा होतो. हा उपाय किमान सवा महिन्यांपर्यंत करणे आवश्यक आहे. फिट्स आलेल्या माणसाच्या नाकपुडित कांद्याचा रस लावल्याने त्याला सुद्धा येते.
- लसूण वाटून नाकाला लावल्यानस फिट्सच्या रोग्याला शुद्ध येते. आठ-दहा लसणाच्या पाकळ्या दुधात उकळून ते दुध प्यायलाने काहीं दिवसात फिट्सचा रोग दूर होतो.
- करवंदाची 25-30 पाने, ताकात वाटून दोन आठवडे रोज सेवन केल्याने फिट्स येणे बंद पडते. रोग्यास एक पाव दुधात, पाव कप मेहंदीचा रस मिसळून पाजल्याने फायदा होतो.
- मोहरी वाटून हुंगविल्याने रोग्यास शुद्ध येते.
- मूठभर तुळशीच्या पानात 4-5 कापूराच्या वड्या मिसळून रोग्यास हुंगायला लावणे.
तर मित्रांनो वर सर्व डोक्याशी संबंधित आजार व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.
आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.
आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम.
टिप्पणी पोस्ट करा
तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा