सौंदर्य व त्याचे घरेलू उपचार घरचा वैद्य  Beauty And Its Home Remedies - घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात
हेल्लो नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे आपल्या सर्वांचं घरचा वैद्य या ब्लॉग वेबसाईट मध्ये. मित्रांनो, आज आपण सौंदर्य व त्याचे घरेलू उपचार जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो जाणून घेऊया.

सौंदर्य व त्याचे घरेलू उपचार


चेहऱ्यावर डाग,सुरकुत्या 

  • चेहऱ्यावर मुरूम, पुटकुळ्या मुळे डाग पडल्यास बटाटे उकडून थंड करावे आणि सालासकट वाटून घ्यावेत. त्यात काकडीचा रस टाकून थोडा सा लिंबाचा रस मिसळावा या मिश्रणाने चेल्यावर लेप कराव. तासाभराने धूवून टाकावा. काही दिवस प्रयोग केल्याने डाग नाहिसे होती. 
  • चेहऱ्यावर ची काळसर झाक दूर करण्यासाठी एक चमचा व्हिनिगर मधे अंड्याचा पांढरा बलक आणि पिकलेले केळे चांगल्याप्रकारे मिसळावे या पेस्ट ला चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावे नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावे. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग करावा. 
  • पिकलेल पपईचा तुकडा कापून चेहऱ्यावर रगडावा. दहा मिनिटांनी चेहरा धूवून टाकावा. थोड्याच दिवसात चेहरा उजळून चेहऱ्यावरचे डाग, सुरकुत्या इत्यादी नाहिश्या होतील . 

मुरुम 

  • एक कप दूध चांगले आटवावे. दाट झाल्यावर एक लिंबू पिळून हलवत असतांना थंड करावे. रात्री झोपतांना याला - चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावे. सकाळी धुवून घ्यावे. याने मुरूमं बरी होउन चेहरा उजळून तजेलदार होतो. 
  • मसूर ची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. दहा मिनिटांनी चेहरा धूवून घ्यावा आठवडाभर हा उपाय सकाळ संध्याकाळ करावा.
  • संत्र्याची साले 100 ग्रॅम घेऊन वाळवून वाटून चूर्ण करावे 100 ग्रॅम बाजरी चे पीठ व 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धत काही दिवसातच चेहरा उजळून निघेल. 
  •  गाजराचा रस, टमाट्याचा रस, बीट चा रस 25 - 25 ग्रॅम दररोज दोन महिने पर्यंत प्याल्याने चेहऱ्यावरची मुरुमे, डाग, सुरकुत्या नाहिश्या होतात . 
  • लिंबाचा रस गाळलेला, दोन तोळे = गुलाब अर्क, 2 तोळे ग्लिसरिन, मिसळून बाटलीत  भरून ठेवावे. रात्री झोपतांना चेहऱ्यावर चोळून लावावे. वीस दिवस उपचार केल्याने मुरुमं पुटकुळ्या दूर होउन त्वचा मउ व तजलेदार होते. 

केस गळणे

  • सकाळी वाळलेला आवळा पाण्यात भिजवून ठेवावा. रात्री झोपताना आवळा वाटून केसांत लावून लेप करावा. एक तासान कापडाने पुसुन घ्यावे. सकाळी स्नान करतांना धूवून घ्यावे. 
  • केस धुतांना साबण किंवा घॉम्पू वापरू नये. शेतातली स्वच्छ माती घेउन त्याने केस धुवावे. माती उपयोग करण्या पूर्वी 15-20 मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावी. चांगली चोळून गाळून घ्यावा व त्या पाण्याने केस धुवावे

केसात कोंडा होणे 

  • केस धुवायच्या 4 - 5 तास अगोदर अर्धा कप लिंबाच्या र जराशी साखर मिसळून केसांमध्ये लावावी.
  • आवळा व शिकेकाई ने धुतल्याने ही केसातला कोंडा नष्ट होतो. 

टक्कल पडणे 

  • 2 - 3 लसणाच्या पाकळ्या डोळ्याल्या लावायच्या सुरम्या बरोबर खरळीत वाटाव्या. या चटणीला टक्कल पडलेल्या भागावर लावावे. जळजळ झाली तर अगोदर तूप किंवा लोणी लावून मग त्यावर हा लेप लावावा. 20 ते 30 दिवस हा लेप दररोज करावा. 
  • दिवसातून 2 - 3 वेळा कोथिंबिरीच्या रसाचा मसाज केल्याने काही दिवसातच फायदा होतो.

पांढरेकेस काळे करणे

  • 100 ग्रॅम मेंदीची पावडर, 100 ग्रॅम आवळ्याचे चूर्ण आणि 250 ग्रॅम चहापत्तीचे पाणी घेउन लोखंडाच्या कढईत तीन दिवस ठेउन द्यावे. त्यानंतर यात गरजेनुसार पाणी मिसळून केसांत लावावे. दर 15 दिवसांनी हा प्रयोग केल्याने केस अगोदर तांबूस घेऊन नंतर नैसर्गिक रित्या काळे होतील. 
तर मित्रांनो वर सौंदर्य व त्याचे घरेलू उपचार सांगितले आहेत. आपणास कधीपण वरील पैकी कोणताही आजार असल्याचे जाणवले तर आपण या घरेलु उपचार करू सकता.

आपल्याला जर आजचा हा पोस्ट आवडला असेल तर कमेंट करुन आम्हाला जरूर कळवा कमेंट बॉक्स आपलाच आहे आरोग्य विषयक अधिक माहिती साठी आजच घरचा वैद्य - तुमचे आरोग्य तुमच्या हातात ह्या ब्लॉग वेबसाइट ला सब्सक्राइब करा.
आपण इथं कनेक्ट होऊ शकतो.

Facebook :- facebook page [follow]

Twitter :- twitter page [follow]

Google+ :- google+ page [follow]

Youtube :- youtube channel [subscribe now]

आज साठी बस इतकेच पुन्हा भेटुया नविन पोस्ट मधे तो पर्यंत नमस्कार जय हिन्द वन्दे मातरम. 

Post a Comment

तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट जरूर करा

थोडे नवीन जरा जुने